Site icon Silver Swans

आरशात माझ्या…

आरशात माझ्या…

    -रती

 

आरशात माझ्या क्षितिज मी पाहत आहे,

दाटून आल्या आभाळातून,

सरी आठवणींच्या बरसत आहेत…

उलगडले जेव्हा संचित आमचे,

ओठांवर होते हसू ओळखीचे,

मृगजळ नाही, सत्य असावे,

जे अंतरंगी माझ्या वसे…

आरशात माझ्या क्षितिज मी पाहत आहे,

निजलेल्या क्षणांची कादंबरी होत आहे…

-Rati J. 

Exit mobile version